Sameer Amunekar
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांचा नॉनव्हेज खाण्याकडे अधिक कल असतो. पण दररोज नॉनव्हेज खाण्याचे काही गंभीर तोटे आहेत, जे तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
सतत चिकन किंवा जास्त तेलकट मांसाहार केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक होतो. फॅटी मीट, तळलेले पदार्थ हे आर्टरीमध्ये ब्लॉकेज निर्माण करतात.
नॉनव्हेजमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. हे प्रोटीन पचवण्यासाठी किडनीवर अतिरिक्त ताण येतो. दीर्घकाळ अशा प्रकारचा आहार घेतल्यास किडनीचे कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो.
मांसाहारात कॅलोरी आणि फॅट्स अधिक प्रमाणात असतात. नियमित अशा प्रकारचा आहार घेतल्यास शरीरात चरबी साठते आणि लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणासोबतच मधुमेह आणि बीपीसारखे आजार होण्याची शक्यता असते.
मांसाहारात फायबर कमी असतो, त्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो. परिणामी अपचन, गॅस, बद्धकोष्ठता असे त्रास सुरू होतात.
सतत मसालेदार आणि तेलकट मांसाहारामुळे त्वचेवर पुरळ, मुरूम, आणि पिंपल्स यासारखे त्रास होऊ शकतात.