Manish Jadhav
दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दूधात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. आजारपणातही डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला अनेकवेळा देतात.
आज (9 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून दूधामध्ये मखाने मिसळून खाल्ल्याने आरोग्याला काय फायदा मिळतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
दूधात मखाने मिसळून खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मखाने खाल्ल्याने अनेक शारीरिक आजार दूर होतात.
ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी तर मखाने वरदान आहेत.
मखाने आणि दूध एकत्र खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. मखाने पोषक म्हणून ओळखले जातात. यांना सुपर फूड मानले जाते. तर दूधाला तर पूर्ण अन्न म्हटले जाते.
दूधात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, लोह आणि जस्त मखान्यात मोठ्याप्रमाणात असतात.
मखाने दूधात मिसळून नियमित खाल्ल्यास हाडे आणि दात दोन्ही अगदी मजबूत आणि आरोग्यदायी होतात.