Manish Jadhav
गोव्यावर निसर्गाची झालेली उधळण पाहण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने येतात.
पश्चिम घाटात वसलेल्या गोव्यावर निसर्गाची झालेली किमयागिरी मोहवून टाकते. गोव्याला एकदा भेट देणारा पर्यटक पूर्णपणे बदलून जातो.
गोव्यातील शांत समुद्रकिनारे पर्यटकांना साद घालतात. निवांतपणे समुद्रकिनारी पहडून पर्यटक निरभ्र आकाशाशी बोलू लागतात.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या खट्याळ मनाला इथला माहोल पाहून उधाण येतं. त्यांचं ते खट्याळ मनही गोमंतकीय होऊन जातं.
देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या इथली संस्कृतीही साद घालते. मनाला भावणारे इथले फेस्टिव्हल प्रसन्नता देऊन जातात.
गोव्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. तुम्ही या महिन्यात गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी फेस्टिव्हलची मजा लुटता येईल.