Manish Jadhav
गोवा म्हटलं की, पश्चिम घाटाच्या निसर्ग राजीत वसलेला गोवा पटकन डोळ्यांसमोर तरळून जातो.
गोव्यावर निसर्गाची झालेली किमयागिरी पाहून पर्यटकाचं मन बावरं होऊन जातं. गोवा पर्यटकांना साद घालतो.
गोव्यातील शांत आणि मनाला प्रसन्न करणारे समुद्रकिनारे पर्यटकांना मोहून टाकतात.
गोव्यातील न्यारी दुनिया पर्यटकांच्या मनाला साद घालते. कॅसिनो, क्लब, पार्टी आणि बरंच काही... पर्यटकांना भुरळ पाडतं.
गोव्यात आल्यानंतर पर्यटक बेधुंद होऊन मौजमस्ती करतात. मस्तीचा माहोल पर्यटकांच्या बेधुंद मनाला साद घालतो.
गोव्यात आल्यानंतर तुम्हाला गोवन संस्कृतीचं दर्शन घडतं. फेस्टिव्हलच्या माध्यमातून गोवनं संस्कृतीची झलक पाहायला मिळते.