Manish Jadhav
यंदाचा बिग बॉस मराठी सीझन आतापर्यंत आणेख अर्थांनी खास ठरत आहे. बिग बॉस हिंदी प्रमाणे बिग बॉस मराठी सीझन 5 देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
जस-जसा सीझन पुढे जात आहे तस-तशी बिग बॉसच्या घरातील स्पर्धाही कठीण होत चालली आहे. यातच, मिडविक एव्हिक्शनमधून काल (3 ऑक्टोबर) एक महत्वाची स्पर्धक बाहेर पडली.
मराठी सीने सृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणारी गोव्याची वंडरगर्ल वर्षा उसगांवकरांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.
वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसच्या घरात अनेक चढ-उतार पाहिले. 70 दिवसांच्या या सिजनमध्ये 67 दिवस टिकून राहण्यात त्या यशस्वी ठरल्या.
मात्र काल ( 3 ऑक्टोबर) त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. वर्षा उसगावकर यांचं बिग बॉसचा किताब जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी एक पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.
बिग बॉसच्या माध्यमातून मी स्वतःला नव्यानं ओळखलं. काही आव्हानं नक्कीच आली. पण मी या आव्हानांचा निकराने सामना केला. बीग बॉसच्या घरात मला नवे मित्र मिळाले, अशा आशयाची पोस्ट वर्षा उसगांवकर यांनी केली.
वर्षा उसगावंकर यांच्या भावूक पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. एक जण म्हणाला, ताई वेल प्लेड, तुम्ही कधीही तुमच्या स्टारडमचा अहंकार दाखवला नाही...! तर दुसऱ्याने लिहिले, तुम्ही कठीण परिस्थितीत संयमाने खेळलात... सलाम!