Weight Loss Tips: वजन कमी होण्याऐवजी वाढतंय? 'या' फळांपासून राहा दूर

Sameer Amunekar

वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा समावेश करणे ही एक चांगली सवय मानली जाते. मात्र, काही विशिष्ट फळे अशी आहेत की ज्यांचं प्रमाणाबाहेर सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

केळं

केळं हे नैसर्गिकरित्या ऊर्जादायी आहे, पण त्यात कॅलोरी आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते. व्यायाम न करताच दिवसभरात 2-3 केळी खाल्ल्यास वजन वाढू शकते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं, पण सतत खाल्ल्यास त्यातील साखर वजनवाढीस कारणीभूत ठरू शकते. विशेषतः जर तुम्ही "फळं खाऊनच आहार घेतो" असं म्हणत सतत सफरचंद खात असाल, तर ते उलट परिणाम देऊ शकतं.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

आंबा

आंबा हे गोडसर व साखरयुक्त फळ आहे. उन्हाळ्यात अधिक आंबे खाल्ल्यास कॅलोरीज शरीरात जास्त प्रमाणात साठतात.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

द्राक्ष

अंगूर हे लहान पण गोड फळ आहे आणि सहज जास्त प्रमाणात खाल्लं जातं. यामध्ये साखर खूप जास्त असून ते वजन वाढवू शकतं.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

चीकू

चीकूमध्ये नैसर्गिक साखर खूप प्रमाणात असते. दररोज चीकू खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak
Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा