Sameer Amunekar
वयाच्या अवघ्या 20व्या वर्षीच केस गळायला लागणे अनेकांसाठी धक्कादायक आणि त्रासदायक ठरू शकते. पूर्वी मध्यम वयात जाणवणाऱ्या या समस्येचं प्रमाण आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे.
कॉलेज, करिअर, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे निर्माण होणारा तणाव हा केस गळण्याचं एक मुख्य कारण आहे. तणावामुळे केस गळू लागतात.
फास्ट फूड, जंक फूड किंवा अत्यंत कमी पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन, व्हिटॅमिन D मिळत नाही. हे पोषण तुटल्यामुळे केस कमजोर होऊन गळायला लागतात.
PCOS, थायरॉईड, किंवा इतर हार्मोनल त्रासांमुळे केसांची मुळं कमजोर होतात. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन हे मोठं कारण ठरू शकतं.
जर आई-वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनाही लवकर केस गळण्याची समस्या असेल, तर ही समस्या तुमच्यातही येण्याची शक्यता अधिक असते. याला Male Pattern Baldness किंवा Female Pattern Hair Loss म्हणतात.
डेली स्ट्रेटनिंग, कर्लिंग, ब्लो ड्राय, किंवा रासायनिक रंग-डाय वापरणं यामुळे केसांचे नैसर्गिक प्रोटिन कमी होतं आणि केस गळू लागतात.
रात्री उशिरापर्यंत जागणं, मोबाईल/लॅपटॉपचा अति वापर, व्यायामाचा अभाव – या सवयी केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. शरीराची नैसर्गिक रिपेअर प्रक्रिया झोपेमुळेच होत असल्याने नीट झोप न मिळाल्यास केस गळतात.