Sameer Amunekar
वजन कमी करण्यासाठी भात आणि पोळी दोन्ही खाऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे प्रमाण, पोषणमूल्य आणि एकूण आहार.
एका मध्यम पोळीत आणि एका वाटी शिजलेल्या भातात कॅलरीचे प्रमाण साधारण सारखे असू शकते. त्यामुळे फक्त भातामुळेच वजन वाढते, हा समज पूर्णपणे बरोबर नाही.
गव्हाची पोळी फायबरमुळे अधिक वेळ पोट भरल्याची भावना देऊ शकते. मात्र ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळही चांगला पर्याय ठरू शकतो.
भात किंवा पोळी यापैकी एकच निवडण्याऐवजी योग्य प्रमाणात खाणे, भरपूर भाज्या आणि पुरेसे प्रथिने घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
रात्री हलके जेवण करा. कमी प्रमाणात भात किंवा 1-2 पोळ्या, त्यासोबत डाळ, भाजी आणि सॅलड घेतल्यास संतुलित आहार मिळतो.
ज्यांना जास्त शारीरिक मेहनत असते त्यांच्यासाठी भात उपयुक्त ठरू शकतो, तर वजन नियंत्रणासाठी फायबरयुक्त पोळी किंवा ब्राऊन राईसचा पर्यायही चांगला आहे.
वजन कमी करण्यासाठी भात किंवा पोळी बंद करण्याची गरज नाही. योग्य प्रमाण, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हेच यशस्वी वजन कमी करण्याचे खरे रहस्य आहे.