Sameer Amunekar
त्वचा सुंदर दिसण्यासाठी महागडी उत्पादनेच लागतात असे नाही. योग्य स्किनकेअर आणि काही सोप्या सवयींमुळेही नैसर्गिक चमक मिळू शकते.
ताजे कोरफडीचे जेल 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि ती मऊ व तजेलदार दिसते.
1 चमचा मध आणि 1 चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर धुवा. त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.
दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि त्वचा अधिक फ्रेश दिसते.
संत्री, लिंबू, आवळा, पेरू यांसारखी व्हिटॅमिन C असलेली फळे खाल्ल्याने कोलेजन निर्मितीस मदत होते आणि त्वचेची चमक वाढते.
रोज 7-8 तासांची शांत झोप त्वचेच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाची असते. अपुरी झोप घेतल्यास चेहरा निस्तेज दिसू शकतो.
घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होऊन नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होते.