Akshata Chhatre
पनीर, चणे किंवा मोड आलेली कडधान्ये यांचे सॅलड खा. यातील प्रोटीन स्किन सेल्स रिपेअर करून चेहऱ्यावर नैसर्गिक निखार आणते.
दही खाल्ल्याने पोट साफ राहते, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. यामुळे पिंपल्स कमी होतात आणि स्किन टेक्सचर सुधारते.
दिवसातून एकदा ग्रीन टी प्या. यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात आणि चेहरा फ्रेश ठेवतात.
स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी कोलाजन वाढवण्यास मदत करतात. यामुळे त्वचा घट्ट (Tight) आणि डागमुक्त दिसते.
बदाम, अक्रोड आणि जवस खा. यामुळे त्वचा आतून मॉइश्चराईज राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
पार्लरमधील केमिकल्स फेशियलपेक्षा 'डाएट ग्लो' जास्त सुरक्षित आहे. यामुळे रॅशेस किंवा इन्फेक्शनचा धोका उरत नाही.
लग्नाच्या १ महिना आधी हे बदल करा. तुमची त्वचा केवळ लग्नाच्या दिवशीच नाही, तर आयुष्यभर चमकत राहील!