Sameer Amunekar
त्यांच्या बोलण्यात मध्ये मध्ये न पडता शांतपणे ऐका. रागाच्या वेळी वाद घालणे टाळा.
रागाच्या क्षणी स्पष्टीकरण देऊ नका. थोडा वेळ द्या, जेव्हा ते शांत होतील तेव्हा संवाद साधा.
एखादा मजेदार किस्सा, फोटो किंवा आवडता गाणं शेअर करून वातावरण हलकं करा.
आपल्या चुकीची जाणीव झाल्यास मनापासून ‘सॉरी’ म्हणा. बनावटपणा टाळा.
त्यांच्या रागामागचं कारण समजून घ्या. “तुला काय त्रास झाला?” असे विचारून काळजी दाखवा.
राग शांत होईपर्यंत त्यांच्यावर दबाव आणू नका. एकांत हवा असल्यास ती द्या.
समस्या सोडवण्यासाठी आपण तयार आहात हे सांगा आणि सौम्य स्पर्श किंवा हगने जवळीक दाखवा.