Sameer Amunekar
खाडी, डोंगर आणि अथांग अरबी समुद्र यांचा एकाच ठिकाणी संगम पाहायला मिळतो. निसर्गप्रेमींना मोहून टाकणारा अनुभव येथे आहे.
गर्दीपासून दूर असलेला हा किनारा ध्यान, फेरफटका आणि रिलॅक्ससाठी परफेक्ट.
वेंगुर्ल्यापासून अवघ्या ७ किमी अंतरावर असल्यानं अल्प वेळेत निसर्गाच्या सान्निध्यात पोहोचता येते.
गावाच्या दक्षिणेस वाहणारी दाभोलीची खाडी परिसराला वेगळीच हिरवळ आणि शांतता देते.
उत्तरेस केळुस व तेंडोली, पूर्वेस खानोली आणि पश्चिमेला अरबी समुद्र – चारही बाजूंनी निसर्गाचं कवच.
गावातील प्रसिद्ध कोंडु-याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेली गुहा हे वेगळंच आकर्षण.
पावसाळ्यात समुद्राच्या लाटा गुहेच्या तोंडावर आदळतात आणि आसमंतात घुमणारा गंभीर आवाज अंगावर शहारे आणतो.