Manish Jadhav
कलिंगड उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. कलिंगडाच्या फायद्यांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्ही कधी त्याच्या बियांचे फायदे ऐकले आहेत का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कलिंगड खाताना आपण ज्या बिया फेकतो त्या खरंतर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फळांप्रमाणेच बियाही पौष्टिक आहेत. आज (6 मे) आम्ही तुम्हाला कलिंगडाच्या बियांच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत.
कलिंगडाच्या बियांचे पौष्टिक मूल्य ते एक उत्कृष्ट सुपरफूड बनवते. कलिंगडाच्या बियांमध्ये खूप कमी कॅलरीज आढळते.
कलिंगडाच्या बिया लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासोबत अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहेत.
तसेच, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासोबत कलिंगडाच्या बिया इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करण्यास मदत करतात.
मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असणाऱ्या कलिंगडाच्या बिया चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.