Sameer Amunekar
टरबुजाच्या बिया वाळवून बारीक पूड करा. थोडं गुलाबपाणी किंवा दूध मिसळून सौम्य स्क्रब केल्यास मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा उजळ दिसते.
बी पावडर + मध + दही असा फेस पॅक 15 मिनिटे लावा. त्वचेला खोल पोषण मिळून नैसर्गिक चमक येते.
टरबुजाच्या बियांमध्ये झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात, जे अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवायला मदत करतात.
बियांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील सूज कमी करतात, त्यामुळे पिंपल्सचे डाग हळूहळू फिके होतात.
बिया भाजून किंवा पावडर करून रोज थोड्या प्रमाणात खाल्ल्यास त्वचा आतून निरोगी आणि चमकदार राहते.
व्हिटॅमिन E आणि मॅग्नेशियममुळे सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी दिसण्यास मदत होते.
आठवड्यातून 2 वेळा बाह्य वापर आणि संतुलित आहारासोबत सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक, काचेसारखी चमक येते.