Manish Jadhav
उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते. अशा वेळी कलिंगडाचा फेसपॅक त्वचेला थंडावा आणि नैसर्गिक चमक देण्याचे काम करतो.
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशा वेळी कलिंगडाचा फेसपॅक लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा हायड्रेटेड दिसते.
कलिंगडाचा स्वभाव थंड असतो. उन्हामुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ, लालसरपणा आणि रॅशेस कमी करण्यासाठी कलिंगडाचा गर एखाद्या कूलिंग एजंटप्रमाणे काम करतो.
कलिंगडामध्ये 'लायकोपीन' आणि व्हिटॅमिन 'ए' व 'सी' भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.
कलिंगडाचा रस हा एक उत्तम नॅचरल टोनर आहे. हा पॅक लावल्याने चेहऱ्यावरील उघडी छिद्रे (Open Pores) कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारतो.
उन्हात फिरल्यामुळे त्वचेवर सनबर्न किंवा टॅनिंग होते. कलिंगडाचा रस आणि कोरफडीचे जेल एकत्र करून लावल्यास सनबर्नचे डाग हलके होतात.
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन 'ए' असते जे त्वचेतील जास्तीचे तेल (Sebum) नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे उन्हाळ्यात येणारे पुरळ आणि पिंपल्सची समस्या कमी होते.
कलिंगडाचा रस आणि मध एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावर झटपट ग्लो येतो. थकलेल्या आणि निस्तेज त्वचेला उजळवण्यासाठी हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे.