Peshwa Bajirao I History: वाऱ्याचा वेग अन् गनिमी कावा, 500 मर्दांनी हलवलं मुघलांचं तख्त; मराठ्यांचा धगधगता अंगार 'बाजीराव'

Manish Jadhav

वयाच्या 20 व्या वर्षी पेशवेपद

वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून अवघ्या 20 व्या वर्षी त्यांच्या खांद्यावर पेशवेपदाची वस्त्रे सोपवली.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

'हिंदुपदपादशाही'चे स्वप्न

"विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण अटकेपार झेंडा फडकवू," असे म्हणत बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे नेण्याचे ध्येय निश्चित केले.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

41 लढाया आणि एकही पराभव नाही

जगातील मोजक्या सेनापतींपैकी एक, ज्यांनी आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 41 लढाया लढल्या आणि एकाही लढाईत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

दिल्लीवर थेट हल्ला

मुघल सत्तेचा पाया खिळखिळा करण्यासाठी बाजीराव आपल्या फौजेसह अवघ्या 500 घोडदळाच्या मदतीने थेट दिल्लीच्या वेशीवर धडकले होते, ज्यामुळे मुघल सम्राट मोहम्मद शाह भयभीत झाला होता.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

गनिमी कावा आणि वेगवान हालचाली

बाजीरावांच्या युद्धनीतीचा मुख्य कणा म्हणजे 'वेग'. वाऱ्याच्या वेगाने घोडदळ चालवून शत्रूला सावरण्याची संधी न देता अचानक हल्ला करण्यात त्यांचा हातखंडा होता.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

पालखेडची लढाई

त्या काळातील सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या निजामाला पालखेडच्या लढाईत बाजीरावांनी केवळ आपल्या हालचालींच्या जोरावर पाणी पाजले आणि शरणागती पत्करायला लावली.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

माळवा आणि बुंदेलखंड विजय

उत्तरेतील राजकारणात मराठ्यांचे स्थान भक्कम करताना त्यांनी माळवा जिंकला आणि राजा छत्रसाल यांच्या मदतीला धावून जाऊन बुंदेलखंडावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

शनिवारवाडा आणि पुण्याचे वैभव

पुण्याला मराठा साम्राज्याचे सत्ताकेंद्र बनवणारा 'शनिवारवाडा' बाजीरावांनीच बांधला. त्यांच्या काळामुळेच पुण्याला ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

Peshwa Bajirao | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा