Manish Jadhav
जगात काही वनस्पती इतक्या विषारी आहेत की त्यांचा स्पर्श किंवा सेवन सापाच्या विषापेक्षाही घातक ठरते.
आज (15 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशाच एका वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत, जी सापापेक्षाही अधिक विषारी आहे.
ही वनस्पती उत्तर अमेरिकेतील सर्वात विषारी झाड मानली जाते.
या वनस्पतीत सिक्युटॉक्सिन नावाचं विष असतं.
हे विष मज्जासंस्थेवर तात्काळ परिणाम करतं.
तसेच, हे विष झटके, श्वासोच्छ्वास थांबवणे आणि मृत्यू घडवू शकते. याचा परिणाम सापाच्या न्यूरोटॉक्सिनपेक्षाही जलद होतो.
या विषारी वनस्पतीचे नाव वॉटर हेमलॉक असे आहे.