Akshata Chhatre
पावसाळा जरी गारवा आणि हिरवाई घेऊन येत असला, तरी तो आरोग्यासाठी काही गंभीर आव्हानंही उभी करतो.
या काळात दूषित अन्नामुळे पचनाचे आजार, त्वचेच्या अॅलर्जीपासून ते टेपवर्मसारख्या परजीवी संसर्गापर्यंत अनेक समस्या वाढतात.
पावसाळ्यात फळे आणि भाज्या नीट न धुतल्याने बॅक्टेरिया, कीटकनाशके आणि घाण आपल्या शरीरात प्रवेश करतात.
भाज्या आणि फळे नेहमी वाहत्या पाण्यात किमान १-२ मिनिटे धुवावीत, आणि धुतल्यानंतर पूर्णपणे कोरड्या करूनच फ्रिजमध्ये ठेवावीत.
ओलसर ठेवण्याने बुरशी आणि जंतू वाढतात. स्वच्छतेसाठी मीठ किंवा व्हिनेगरच्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवणे हा सोपा व प्रभावी उपाय आहे.
साबण किंवा डिटर्जंट वापरणे धोकादायक ठरते, कारण त्यांचे रसायनिक अवशेष आरोग्यास हानी पोहोचवतात.
नेहमी भाज्या आधी धुवा, मगच कापा यामुळे पोषक तत्वे टिकून राहतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.