Manish Jadhav
असं म्हटलं जात, दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी शरीरासाठी चांगलं असतं.
लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आज (28 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गरम लिंबूपाणी पिण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत...
ज्यांना चरबी कमी करायची आहे किंवा वजन नियंत्रित करायचे आहे त्यांच्यासाठी गरम लिंबूपाणी पिणे फायदेशीर आहे.
दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने केल्यास पचनक्रिया सुधारु शकते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.
तसेच, शरीरातील जळजळ कमी करण्यातही गरम लिंबूपाणी महत्त्वाची भूमिका बजावते.