Akshata Chhatre
१६०० लोकांच्या डेटा अभ्यासातून समोर आले की, डार्क चॉकलेटमधील 'थियोब्रोमाईन' शरीराची वाढण्याची गती मंदावू शकते.
हे तुमचे वर्षांमधील वय नाही, तर तुमचे अंतर्गत अवयव किती निरोगी आहेत आणि पेशी किती कार्यक्षम आहेत, याचे मोजमाप आहे.
हे कोकोमध्ये आढळणारे तत्व सूज कमी करते आणि रक्तप्रवाह सुधारते. १०० ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये २०० ते ४५० मिग्रॅ थियोब्रोमाईन असते.
टेलोमेयर हे क्रोमोझोमचे टोक असतात. थियोब्रोमाईन त्यांना लहान होण्यापासून रोखते, ज्यामुळे पेशींचे आयुष्य वाढते आणि वृद्धत्व उशिरा येते.
संशोधकांनी डीएनए मधील केमिकल बदलांचा अभ्यास केला. ज्यांच्या शरीरात थियोब्रोमाईन जास्त होते, त्यांच्या पेशी अधिक तरुण आढळल्या.
डार्क चॉकलेटला 'अँटी-एजिंग' मानलं जात असलं तरी, त्यात साखर आणि फॅट असते. त्यामुळे याला औषध न मानता केवळ मर्यादित 'ट्रीट' म्हणून खावे.
केवळ डार्क चॉकलेट खाऊन वय कमी होणार नाही. संतुलित आहार आणि व्यायामासोबतच डार्क चॉकलेटचे मर्यादित सेवन फायदेशीर ठरू शकते.