Sameer Amunekar
तरुण दिसणं ही केवळ बाह्य सौंदर्याची बाब नाही, तर आरोग्यदृष्ट्याही ती अत्यंत महत्त्वाची असते.
जेवणात सर्व आवश्यक पोषणतत्त्वांचा योग्य प्रमाणात समावेश केला पाहिजे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, प्रतिकारशक्ती वाढते, आणि त्वचा, केस, हाडं यांचं आरोग्य टिकून राहतं — परिणामी तुम्ही तरुण आणि ताजेतवाने दिसता.
दररोज ७–८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपेमुळे त्वचेचं पुनर्निर्माण होतं आणि चेहऱ्यावर तजेल दिसते.
कार्डिओ, योगा किंवा वेट ट्रेनिंग – काहीही करा, पण हलचाल ही गरजेची आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
दररोज चेहरा स्वच्छ करा, मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन वापरा. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची निगा राखणे अत्यंत गरजेचं.
धूम्रपान व मद्यपान हे दोन्ही त्वचेचं आणि शरीराचं लवकर नुकसान करतात. धूम्रपानामुळे त्वचा कोरडी, सुरकुतलेली व पिवळी दिसू शकते.