Sameer Amunekar
सकाळची सुरुवात जर सकारात्मक झाली, तर संपूर्ण दिवस उर्जायुक्त जातो.
सकाळी ५-६ दरम्यान उठल्यास मन, शरीर आणि वेळ – सगळ्यावर नियंत्रण मिळतं.
उठताक्षणी १-२ ग्लास गरम पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत होते.
१० मिनिटांचं ध्यान किंवा प्राणायाम मन शांत करतं आणि फोकस वाढवतं.
योगा, स्ट्रेचिंग किंवा चालणं फायदेशीर ठरतं. हलकासा व्यायाम शरीर सक्रिय करतं.
प्रोटीन, फायबर आणि फळांनी भरलेला नाश्ता करा. यामुळं तुम्हाला ताजतवान वाटेल.