मोबाइलपासून सुटका हवीये? 'हे' उपाय वापरून बघा, फरक जाणवेलच

Sameer Amunekar

मोबाईलचे व्यसन अनेकांना त्रासदायक ठरत आहे. सतत मोबाईलकडे लक्ष लागणे, वेळ वाया जाणे, मन एकाग्र न होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak

ठराविक वेळ

मोबाईल वापरण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ ठरवा. उदाहरणार्थ, सोशल मीडियासाठी फक्त संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंतच वेळ ठेवा. इतर वेळेस मोबाईलपासून दूर राहा.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak

नोटिफिकेशन्स बंद करा

मोबाईलवरील सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आपण आपोआप फोन उघडतो. त्यामुळे सोशल मीडिया, गेम्स, व अन्य व्यत्यय आणणाऱ्या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स बंद करा.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak

नो फोन झोन

घरात किंवा कामाच्या ठिकाणी अशा काही जागा ठरवा जिथे मोबाईल वापरण्यास मनाई असेल, जसे की जेवणाच्या टेबलावर, झोपण्याआधीचा अर्धा तास, अभ्यास करताना इ. यामुळे मोबाईलपासून थोड दूर राहता येत.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak

मोबाईलऐवजी पर्याय निवडा

मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी पुस्तक वाचन, व्यायाम, छंद जोपासणे, घरातील सदस्यांशी संवाद साधणे असे पर्याय निवडा. यामुळे मन गुंतले राहते आणि मोबाईलची आठवण कमी येते.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak

सवय

वेबस्टोरीमध्ये दिलेल्या सर्व सवयी लागू करण्यासाठी सुरुवातीला थोडी अडचण होईल, पण सातत्याने प्रयत्न केल्यास मोबाईलचे व्यसन नक्कीच कमी करता येते.

How To Reduce Mobile Addiction | Dainik Gomantak
Children Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा