Sameer Amunekar
डेंग्यू हा एक जीवघेणा आजार आहे जो एडीस एजिप्टी (Aedes Aegypti) या डासांच्या चाव्यामुळे होतो. या डासांचा प्रादुर्भाव विशेषतः पावसाळ्यात वाढतो.
डेंग्यू हा एक जीवघेणा आजार आहे जो एडीस एजिप्टी (Aedes Aegypti) या डासांच्या चाव्यामुळे होतो. या डासांचा प्रादुर्भाव विशेषतः पावसाळ्यात वाढतो.
बाथरूममधील बादल्या, कुंड्या, पाण्याचे ड्रम, कुलर, फुलदाण्या यामध्ये पाणी साठून राहिल्यास ते डासांची अंडी घालण्याची जागा बनते.
घरातल्या किंवा बाल्कनीतील कुंड्यांमध्ये ठेवलेले पाणी किंवा ट्रे यामध्ये पाणी साठून राहिल्यास ते डासांसाठी योग्य ठिकाण ठरते.
बाहेर पडलेल्या जुन्या टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, डब्बे यामध्ये पावसाचे पाणी साठते आणि डासांची पैदास होते.
डेंग्यूचा डास सकाळी व संध्याकाळी सक्रीय असतो. घरात खिडक्या-दारे उघडी राहिल्यास डास घरात प्रवेश करू शकतो.