Brain Health: बदाम की अक्रोड… मेंदूच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Manish Jadhav

मेंदू

आपला मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण योग्य आहार घेतला पाहिजे.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

डाएट फड

मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बदाम आणि अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य आणि तल्लख स्मरणशक्तीसाठी बदाम आणि अक्रोडाचे सेवन फायदेशीर ठरते. हे केवळ मानसिक विकासाला चालना देत नाहीत तर यामुळे मेंदूचे कार्य अधिक सुधारते.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

पोषक तत्वे

बदामांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट असतात, जे मेंदूला सक्रिय ठेवतात आणि स्मरणशक्ती देखील वाढवतात.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

अक्रोड

तसेच, अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिडने समृद्ध असते, जे मेंदूचे न्यूरॉन्स मजबूत करण्यास आणि विचार करण्याची तसेच समजून घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

बदाम की अक्रोड फायदेशीर?

जर बदाम आणि अक्रोडमध्ये तुलना केली तर अक्रोड हे मेंदूसाठी थोडे अधिक प्रभावी मानले जाते कारण त्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak

डिमेंशिया आणि अल्झायमर

जे लोक नियमितपणे अक्रोड खातात त्यांना डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी असतो.

Walnuts vs almonds | Dainik Gomantak
आणखी बघा