Akshata Chhatre
जेवल्यानंतर हलकंफुलकं चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण किती चालावं, कधी चालावं, आणि का चालावं – हे जाणून घ्या!
जेवणानंतर लगेच चालायला जाऊ नका. १५ ते २० मिनिटानंतर थोडीशीचक्कर टाका आणि हे सुद्धा हळूहळू चालणं असावं हे लक्षात घ्या.
चालल्यामुळे पचनसंस्था अधिक सक्रिय होते. गॅस, अपचन, जडपणा कमी होतो.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी चालणं रक्तातील साखर नियंत्रित ठेवतं. इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते.
जेवल्यानंतरच्या चालण्यामुळे कॅलोरीज कमी होतात. चरबी साठण्याची शक्यता कमी होते आणि वजन टिकवून ठेवायला मदत.
जेऊन झाल्यावर थोडंसं चालल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि परिणामी झोप नीट होते, शारीरिक आजार कमी होतात.