Akshata Chhatre
घर सजवण्यासाठी बऱ्यापैकी फुल-झाडांचा वापर केला जातो. तुम्हाला माहितीये का घर सजवण्यासाठी जेड प्लँट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
का? कारण या झाडामध्ये काही असे गुण आहेत ज्यांमुळे जास्त पैसे खर्च न करता सुद्धा घर सुशोभित करता येतं.
या झाडाला जास्ती सूर्यप्रकाशाची गरज नसते त्यामुळे कमी प्रकाशाच्या ठिकाणी सुद्धा झाड उत्तम वाढतं. खिडकीत किंवा टेबलावर झाड ठेवता येतं.
या झाडाला वेळोवेळी पाणी देण्याची सुद्धा गरज नसते, हे झाड सुकट मातीत उत्तम रुजतं. ज्यांच्याजवळ वेळ कमी असतो त्यांच्यासाठी हे झाड परफेक्ट आहे.
फेंगशुईनुसार जेड प्लँट पैसा, यश आणि शांतता आकर्षित करतं. हे झाड मुख्य दरवाजाजवळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.
तुम्हाला वेळ काढून याला खत घालावं लागत नाही आणि म्हणून आजच्या बिझी लाईफस्टाईलसाठी हा पर्याय उत्तम ठरतो.
जेड प्लँट तुमच्या घराची फक्त शोभा वाढत नाही, तर सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि हरित आनंद देखील घेऊन येतं.