Manish Jadhav
स्वीडिश लक्झरी वाहन निर्माता कंपनी वोल्वोने (Volvo) आपली सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही XC60 नवीन अवतारात सादर करण्याची घोषणा केली आहे.
2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून जगभरात 15 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झालेल्या या मॉडेलचे हे दुसरे फेसलिफ्ट व्हर्जन असणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हे नवीन मॉडेल भारतात दाखल होत आहे.
नव्या वोल्वो XC60 फेसलिफ्टमध्ये एक नवीन आणि आकर्षक लूक असेल, ज्यात अपडेटेड फ्रंट ग्रिल आणि नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.
एसयूव्हीमध्ये स्मोकी इफेक्ट असलेल्या टेललाईट्स असतील. तसेच, फॉरेस्ट लेक आणि ऑरोरा सिल्व्हरसोबत मलबेरी रेड असे दोन नवीन एक्सटीरियर रंग पर्याय उपलब्ध असतील.
नवीन वोल्वो XC60 च्या केबिनमध्येही अनेक बदल अपेक्षित आहेत. यात 11.2-इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल.
नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये 21% जास्त पिक्सेल डेन्सिटी असेल, ज्यामुळे डिस्प्ले अधिक स्पष्ट दिसेल. यात नवीन ॲप्लिकेशन्स आणि ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सची सुविधा असेल.
ही इन्फोटेनमेंट सिस्टिम Google आणि Qualcomm च्या स्नॅपड्रॅगन कॉकपिट प्लॅटफॉर्मने सुसज्ज असेल, ज्यामुळे वेगवान परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट ग्राफिक्स मिळतील.
वोल्वो XC60 फेसलिफ्टमध्ये 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन कायम असेल, जे 48-व्होल्ट माईल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानाने युक्त असेल. हे इंजिन 247 बीएचपी पॉवर आणि 360 एनएम टॉर्क निर्माण करेल, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह चारही चाकांना पॉवर देईल.