Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांची 1677-78 मधील तंजावर मोहीम ही त्यांच्या दूरदृष्टीचे आणि साम्राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होती.
या मोहिमेमुळे मराठा साम्राज्याची पाळमुळे दक्षिणेत खोलवर रुजली आणि महाराजांचे कर्तृत्व सिद्ध झाले.
राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा विस्तार करणे आणि दक्षिणेतील मराठी सत्ता मजबूत करणे हा या मोहिमेमागील हेतू होता.
महाराजांनी आपली मोहीम अत्यंत गुप्त ठेवली होती. ते पहिल्यांदा श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी गेले, ज्यामुळे लोकांचा गैरसमज झाला की, ते धार्मिक यात्रेवर आहेत.
महाराजांनी त्यानंतर जिंजी किल्ल्याकडे कूच केली. जिंजी किल्ला हा अत्यंत मजबूत आणि मोक्याचा होता. जिंजी जिंकल्यानंतर महाराजांनी वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई यांसारखे महत्त्वाचे किल्ले जिंकले.
तंजावर हे व्यंकोजी राजे भोसले यांच्या ताब्यात होते. शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना भेटण्याची विनंती केली. सुरुवातीला व्यंकोजी टाळाटाळ करत होते, परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना भेटण्यास भाग पाडले.
भेटीनंतर व्यंकोजींनी महाराजांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराजांनी तंजावरवर लष्करी दबाव आणला.
या मोहिमेमुळे मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला, दक्षिणेत एक नवीन मराठा सत्तेचे केंद्र निर्माण झाले.