Manish Jadhav
व्हॉल्वो कंपनीने आपली नवीन XC60 Facelift भारतात लॉन्च केली. व्हॉल्वो ऑटो इंडियाने ही नवीन एसयूव्ही 71.90 लाख या सुरुवातीच्या किमतीत बाजारात आणली.
या नवीन मॉडेलला अपडेटेड डिझाइन, नवीन फीचर्स आणि उत्तम इन-केबिन तंत्रज्ञानासह सादर करण्यात आले आहे. या एसयूव्हीच्या समोर अपडेटेड XC90 सारखी ग्रिल, नवीन फ्रंट बंपर आणि एअर इंटेक देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसते.
XC60 फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. क्वालकॉमच्या नेक्स्ट-जनरेशन स्नॅपड्रॅगन कॉकपिट प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन 11.2 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यात OTA अपडेट्स, बिल्ट-इन गूगल मॅप्स आणि व्हॉइस असिस्टन्सची सुविधा आहे.
या एसयूव्हीच्या आतमध्ये 12.3 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर फिनिशिंग आणि क्रिस्टल गियर सिलेक्टर आहे. कपहोल्डर्सची रचनाही अधिक सुधारित करण्यात आली आहे, ज्यामुळे केबिनचा अनुभव अधिक उत्कृष्ट मिळतो.
नवीन XC60 मध्ये 48V माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 247 बीएचपी आणि 360 एनएमचा टॉर्क जनरेट करते, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि एडब्ल्यूडी (AWD) सिस्टिमशी जोडलेले आहे.
हे इंजिन E20 मानकांना पूर्ण करते आणि केवळ 6.9 सेकंदात ही एसयूव्ही 0 ते 100 किमी/तास इतका वेग पकडू शकते. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार खूपच दमदार आहे.
भारतीय बाजारात या एसयूव्हीची थेट स्पर्धा BMW X3, Mercedes-Benz GLC, Lexus NX 300h आणि Range Rover सारख्या लक्झरी गाड्यांशी होणार आहे.
जगभरात 2.7 दशलक्षाहून अधिक युनिट्सची विक्री झालेली XC60 ही व्हॉल्वोची भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार बंगळूरु प्लांटमध्ये असेंबल केली जात असल्याने, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व व्हॉल्वो कार आता सीकेडी (CKD) युनिट्स आहेत.