Vivo भारतात लॉन्च करणार पहिला फोल्डिंग फोन; मिळणार दमदार फीचर्स

Manish Jadhav

चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo

चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo लवकरच भारतात आपला नवीन फोल्डिंग फोन लॉन्च करु शकतो.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

चीनमध्ये Vivo X Fold 3 Pro लॉन्च केला

कंपनीने चीनमध्ये Vivo X Fold 3 Pro लॉन्च केला आहे. या ब्रँडने हा फोन मार्चमध्ये लॉन्च केला होता.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

पुढच्या महिन्यात भारतात लॉन्च करणार?

ब्रँड पुढील महिन्यात हा हँडसेट भारतात लॉन्च करु शकतो. हा फोन भारतात जूनच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. जर असे झाले तर हा Vivo चा पहिला फोन असेल जो भारतीय बाजारात लॉन्च होईल.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

Vivo X Fold 3 Pro

Vivo X Fold 3 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 8.03-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

Vivo X Fold 3 Pro चे फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 8.03-इंचाची प्रायमरी स्क्रीन आहे, जी एक AMOLED पॅनेल आहे. कव्हर डिस्प्ले 6.53-इंचाचा आहे, जो AMOLED पॅनेलसह येतो. दोन्ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

Vivo X Fold 3 Pro मध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज आहे. यामध्ये Vivo V3 चिप देण्यात आली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची प्रायमरी लेन्स 50MP आहे. याशिवाय, 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak

Vivo X Fold 3 Pro ची बॅटरी

डिव्हाइसला 5700mAh बॅटरी मिळते. डिव्हाइस 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.

Vivo X Fold 3 Pro | Dainik Gomantak
New Maruti Swift | Dainik Gomantak