Manish Jadhav
देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपली 4th जनरेशन स्विफ्ट भारतात लॉन्च केली आहे.
नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे जे 14% अधिक मायलेज देते.
मारुती सुझुकीने 2005 मध्ये पहिल्या जनरेशनची स्विफ्ट भारतात लॉन्च केली होती.
आत्तापर्यंत तिचे भारतात 3 दशलक्ष ग्राहक आहेत. म्हणजेच स्विफ्ट भारतात येऊन 19 वर्षे झाली आहेत.
सुझुकीकडून सांगण्यात आले की, भारतीय कार बाजार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नवीन स्विफ्टच्या निर्मितीसाठी कंपनीने 1450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टची एक्स-शोरुम किंमत 6.49 लाख ते 9.64 लाख रुपये आहे. ही 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi+ आणि ZXi+ ड्युअल टोनचा समावेश आहे.
नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये अगदी नवीन ब्लॅक इंटीरियर आहे. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस फोन चार्जर आणि पुश बटण स्टार्ट/स्टॉप यांसारखे फिचर्स आहेत.
नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे जे 82hp पॉवर आणि 112 Nm टॉर्क जनरेट करते. एवढेच नाही तर आता हे इंजिन 14% अधिक मायलेज देखील देईल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.