Manish Jadhav
विवो त्याच्या स्टायलिश फोन डिझाइन आणि इनोवेटिव्ह फीचर्ससाठी ओळखला जातो.
कंपनीने प्रीमियम परफॉर्मेंस आणि परवडणाऱ्या किमतींचे शानदार कॉम्बिनेशन म्हणून टी सिरीज लॉन्च केली आहे.
आता Vivo ने Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro च्या किमती कमी करुन त्यांना अधिक आकर्षक बनवले आहे, ज्यामुळे ग्राहकांना ते खरेदी करणे सोपे झाले आहे.
विवोने टी सीरीजच्या दोन स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. Vivo T3 Ultra आणि Vivo T3 Pro आता कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे दोन्ही फोन 5 जी सपोर्टसह येतात.
हे स्मार्टफोन ऑगस्ट 2024 मध्ये भारतात लॉन्च झाले होते. प्रीमियम फीचर्स असलेले हे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. नवीन किमतींसह खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.
Vivo T3 Ultra चा 8GB+128GB मॉडेल 29,999 रुपयांना, 8GB+256GB मॉडेल 31,999 रुपयांना आणि 12GB+256GB व्हेरिएंट 33,999 रुपयांना उपलब्ध आहे. पूर्वी त्यांच्या किमती 31,999 रुपये, 33,999 रुपये आणि 35,999 रुपये होत्या.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9200+ प्रोसेसरसह येतो. यात 50 मेगापिक्सेल सोनी IMX921 कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. 5500mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे.
Vivo T3 Pro च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे आणि 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यापूर्वी हे मॉडेल 24,999 आणि 26,999 रुपयांना उपलब्ध होते.
यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 चिपसेटचा सपोर्ट आहे. 50 मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 882 कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची 5500mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.