Manish Jadhav
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळली जात आहे. बुधवारी तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची कर्णधार आणि सलामीवीर स्मृती मंधानाचा जलवा पाहायला मिळाला.
स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावले. स्मृतीने हे शतक केवळ 70 चेंडूत झळकावले. यासह, ती सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय महिला खेळाडू बनली.
या शतकी खेळीसह स्मृतीने एक मोठी कामगिरी देखील केली. महिला वन-डे क्रिकेटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक शतके ठोकणारी ती चौथी खेळाडू ठरली.
महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा रेकॉर्ड मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने 15 शतके ठोकली आहेत. सुझी बेट्स 13 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर टॅमी आणि स्मृती यांच्या नावावर प्रत्येकी 10 शतके आहेत.
स्मृतीने 80 चेंडूत 135 धावांची धमाकेदार खेळी केली. तिने तिच्या खेळीत 12 चौकार आणि सात षटकार मारले.
स्मृती आणि प्रतिका रावल यांच्यात पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी झाली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली, जी भारतीय महिला संघासाठी कोणत्याही विकेटसाठी तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे.
स्मृतीने 2024 मध्ये वन-डे सामन्यांमध्ये 16 डावात 62.25 च्या सरासरीने 996 धावा केल्या आहेत. या काळात तिने चार अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत. तिने 123 चौकार आणि 16 षटकारही मारले आहेत.