Manish Jadhav
अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष्य या निवडणूकीकडे असते.
अमेरिकेत होणाऱ्या या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्य नावाची खूप चर्चा झाली. यातच आता त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
विवेक रामास्वामी यांच्या संपत्तीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडवली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, रामास्वामी यांच्या संपत्तीत $100 दशलक्ष (अंदाजे रु. 830 कोटी) पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
विवेक रामास्वामी 11 महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले होते, मात्र या अकरा महिन्यांच्या तुलनेत त्यांची संपत्ती वाढली आहे. रामास्वामी यांनी त्यांची एकूण अंदाजे संपत्ती $840 दशलक्ष असल्याचे घोषित केले होते, जी त्यांच्या प्रचारानंतर $960 दशलक्ष झाली आहे.
राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीत आपण निवडून आल्यास अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवू, असे विवेक रामास्वामी म्हणाले होते.
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणार्या कुणालाही दया दाखवली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल. या बेकायदेशीर स्थलांतरितांना आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या मुलांचे नागरिकत्वही आम्ही रद्द करु, असेही रामास्वामी म्हणाले होते.