Manish Jadhav
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी आता अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला आहे.
तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी यांनी चेन्नईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'द्रमुक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण मशीद पाडून मंदिर बांधणे मान्य नाही.
उदयनिधी यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य करुन गोंधळ निर्माण केला आहे. त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि डेंग्यू यांसारख्या आजारांशी केली होती. विशेष म्हणजे, द्रमुकचा इंडिया आघाडीत समावेश आहे.
राम मंदिराच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध पक्षांचे नेते मर्यादा सोडून वक्तव्य करत आहेत. यातच आता, काँग्रेस नेते उदित राज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन गोंधळ निर्माण केला आहे.
आता उदित राज यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य करुन तारे तोडले आहेत. राज म्हणाले की, '' आमच्या कलयुगाची सुरुवात 22 जानेवारीला म्हणजेच राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर होणार आहे.''