Manish Jadhav
देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम आदानी यांचा आज वाढदिवस आहे. ते आदानी समूहाचे सर्वेसर्वा आहेत. चला तर मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा प्रवास जाणून घेऊया...
गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी अहमदाबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
त्यांना (Gautam Adani) अभ्यासात फारसा रस नव्हता, म्हणून त्यांना अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी अहमदाबादमध्ये घरोघरी जावून साड्या विकल्या. यामधून त्यांची बऱ्यापैकी कमाई व्हायची.
त्यांना (Gautam Adani) अभ्यासात फारसा रस नव्हता, म्हणून ते छोट्या-छोट्या नोकऱ्या करु लागले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अहमदाबादमध्ये घरोघरी जावून साड्या विकल्या. यामधून त्यांची बऱ्यापैकी कमाई व्हायची.
गौतम यांनी खिशात 100 रुपये घेऊन मायानगरी मुंबई गाठली. अनोळखी शहरात ना नातेवाईक, ना मित्र, ना कोणी जवळचा मित्र होता.
1988 मध्ये गौतम अदानी यांनी अदानी समूहाचा पाया घातला. 1991 मध्ये आर्थिक सुधारणांमुळे अदानींचे नशीब फळफळले. त्यांनी खूप वेगाने प्रगती केली.
1995 मध्ये गौतम अदानी यांच्या पोर्ट कंपनीला मुंद्रा बंदर चालवण्याचे कंत्राट मिळाले, त्यानंतर त्यांचा व्यवसाय सुरु झाला. अदानी पॉवर लिमिटेड 1996 मध्ये अस्तित्वात आली.
10 वर्षानंतर अदानींनी वीज निर्मिती व्यवसायातही एन्ट्री केली. गौतम अदानी यांचा व्यवसाय एकामागून एक विस्तारत राहिला.
अदानी समूह आता कोळसा खाणकाम, विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि सिटी गॅस रिटेलर, सिमेंट व्यवसाय, रस्ते बांधकाम, संरक्षण उत्पादन आणि रेल्वे पायाभूत सुविधा या क्षेत्रात कार्यरत आहे.