Sameer Panditrao
मडगावमध्ये रविवारी कार्निव्हल मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
शोभायात्रेची सुरुवातहॉली स्पिरीट चर्च येथून मिरवणुकीला दुपारी सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळापर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी बावटा दाखवून मिरवणुकीला प्रारंभ दिला. यावेळी गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते.
मिरवणुकीत पारंपरिक गोमंतकीय जीवनशैली दर्शवणारे चित्ररथ होते.
मस्त्य व्यवसाय, गोव्याची कृषी परंपरा, समुद्र कासव संवर्धन, पोदेर अशा विविध थीम्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रेक्षकांनी या भव्य चित्ररथांना मोठ्या आनंदाने दाद दिली. पारंपरिक संगीत आणि नृत्याने वातावरण अधिक रंगतदार झाले.
मडगावमध्ये कार्निव्हलमुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले. पर्यटक आणि स्थानिकांनी या रंगतदार सोहळ्याचा भरपूर आनंद घेतला..