Potekar Festival: कार्निव्हलच्या रंगात रंगले दिवाडी बेट; गावात अवतरले पारंपरिक पोतेकार

Sameer Amunekar

दिवाडी गाव

कार्निव्हलच्या दिवसात अनेकांची एखादी फेरी दिवाडी बेटावर आपोआपच होते. आकर्षण असते ते तिथल्या पोतेकारांचे. कालपासून हे पोतेकार दिवाडी गावात अवतरले आहेत.

Potekar Festival | Dainik Gomantak

भीतीदायक पोशाख, मुखवटे

पोर्तुगीज काळापासूनच या गावात साजरा होणारा हा उत्सव कार्निव्हल बरोबरच येतो. या उत्सवाच्या काळात या बेटावरील लोक भीतीदायक पोशाख आणि मुखवटे परिधान करून पोतेकार बनतात आणि लोकांना घाबरवत गावात फिरतात.

Potekar Festival | Dainik Gomantak

मुखवटे स्वतः बनवतात

विशेष म्हणजे त्यांनी परिधान केलेले मुखवटे त्यांनी स्वतःच बनवलेले असतात.‌ त्यांच्या कमरेवर आणि पायांच्या घोट्यावर घंटा लटकवलेल्या असतात ज्यांचा आवाज दूरवर ऐकू येतो. त्यांच्या हातात असलेली पिशवी (साख) त्यांना अधिकच भयप्रद बनवते.

Potekar Festival | Dainik Gomantak

भीती आणि मनोरंजन

भीती आणि मनोरंजन या दोन्हींचा अनुभव एकाच वेळी देणारा हा उत्सव आता जागतिक पातळीवर ओळखला जाऊ लागला आहे. ब्लॉगर्स आणि समाजमाध्यमावरील लोकांनी या उत्सवाला सर्व स्तरावर लोकप्रिय बनवले आहे.

Potekar Festival | Dainik Gomantak

उत्सव 4 मार्चपर्यंत चालणार

दिवाडी बेटावर काल सुरू झालेला हा उत्सव 4 मार्चपर्यंत चालणार आहे. शेवटचा दिवस या उत्सवाची मजा घेण्याचा सर्वोत्तम दिवस असतो असे मानले जाते.‌

Potekar Festival | Dainik Gomantak

मिठाई दिली जाते

हे पोतेकर जेव्हा गावातील घरांना भेटी देतात तेव्हा घरातील कुटुंबांकडून त्यांना अन्न, पेये आणि मिठाई दिली जाते. या गावातील लोकांनाच पोतेकार बनता येते.पोतेकर जरी गावातील व्यक्ती असली तरी ती नेमकी कोण आहे हे मात्र ओळखणे शक्य होत नाही.

Potekar Festival | Dainik Gomantak
Team India | Dainik Gomantak
येथे क्लिक करा