Kavya Powar
व्हिटॅमिन ई मध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात. आजकाल व्हिटॅमिन ई कॅप्सुल सप्लीमेंटच्या स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे.
व्हिटॅमिन ईच्या परिणामामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चिरतरूण दिसते.
दोन थेंब व्हिटॅमिन ई एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करा आणि चेहरा आणि इतर भागाच्या त्वचेवर त्याचा मसाज करा. आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना नेहमी तुम्ही या तेलाचा मसाज तुमच्या त्वचेवर करू शकता.
सुरकुत्या, डार्क सर्कल्स, निस्तेज त्वचा, सैलसर त्वचा या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईचा वापर करू शकता.
व्हिटॅमिन ई ऑईल थेट त्वचेवर लावू नका. तुमच्या वापरातील एखाद्या नैसर्गिक तेलात ते मिसळून मगच त्वचेवर लावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.