Sameer Amunekar
व्हिटॅमिन सी चा सर्वात मोठा स्रोत म्हणजे संत्री. उन्हाळ्यात संत्री खाल्याने शरीरातील कोलॅजन (Collagen) वाढते, ज्यामुळे त्वचा लवचिक आणि चमकदार राहते.
सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा येतो.
कलिंगडामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी आणि व्हिटॅमिन सी असते. हे त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि उन्हामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते.
पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम आणि व्हिटॅमिन सी असते. हे त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढून टाकण्यास आणि डाग कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरते.
अननसामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे चेहऱ्यावरील मुरुमे आणि बारीक रेषा कमी करून त्वचा तरुण आणि टवटवीत ठेवण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरी केवळ चवीलाच चांगली नाही, तर ती त्वचेसाठी उत्तम टोनर म्हणून काम करते. यातील व्हिटॅमिन सी सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.
किवीमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते. दररोज एक किवी खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा चकाचक दिसू लागतो.