अनेक दिवसांनी गोव्याला जाताना...

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात राहणं

गोव्यात राहणं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वावरणं, म्हणून गोव्यापासून दूर गर्दी आणि गोंगाटात राहणं नकोसं वाटणं साहजिक आहे.

गोव्याला परत जाणं

अनेक दिवसानंतर गोव्याला परत जाणं यापेक्षा मग आणखीन कशातच सुख वाटत नाही. कामाच्या गोंगाटातून काहीसा मोकळा वेळ इथेच मिळतो.

मायेचं आगार

तुम्ही कधी असा अनुभव केला आहे का? इतर सर्वांसाठी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा काही लोकांसाठी मात्र मायेचं आगर असतो.

घर

पर्यटनाच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर नाच-गाणी, पार्टी आणि गोंगाट असला तरीही घर म्हणून गोव्याकडे बघताना त्याचं रूप पालटून जातं.

संध्याकाळचा चहा

घरचं जेवण, दुपारची झोप, संध्याकाळचा चहा.. गोव्यापासून दूर राहिलेल्या प्रत्येक गोमंतवासीयांसाठी याच गोष्टी महत्वाच्या असतात.

आनंद

आपल्या माणसांचा सहवास आणि आपल्या घरी असल्याचा आनंद काही वेगळाच असतो.

अनेक दिवसांनी गोव्याला जाताना....

आणि मग अनेक दिवसांनी गोव्याला जाताना मनात फक्त आणि फक्त आनंद असतो.

आणखीन बघा