Sameer Panditrao
दापोलीमध्ये हर्णे बंदराजवळ 3 किल्ले एकत्रित पाहता येतात.
कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले अशी माहिती स्थानिक देतात.
गोवा किल्ला जवळपास सव्वातीन हेक्टर जागेत पसरलेला आहे.
सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे आणि गोवा किल्ला भूकोट आहे.
या किल्ल्याचे प्रमुखद्वार समुद्राच्या बाजूला आहे.
तटबंदीचा काही भाग आणि पायऱ्या अजून सुस्थितीत आहेत.
या किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी 19 शिपाई होते, अशी नोंद मिळते.
या किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ला अधिकच खुलून दिसतो.