Sameer Panditrao
पावनखिंडीतिला बाजीप्रभू आणि तीनशे मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आपल्याला माहित आहे.
बाजीप्रभू खिंडीत थांबले आणि महाराज वेगाने विशाळगडाकडे गेले.
विशाळगडाच्या पायथ्याशी सूर्यराव, जसवंतराव मोर्चे लावून उभे होते.
महाराजांनी भवानी तलवार काढली आणि त्या मोर्चांवर तुटून पडले.
सूर्यराव, जसवंतरावाच्या तुकड्या जोरात आक्रमण करत होत्या. रात्रभर धावपळीने दमलेले महाराज आणि मावळे तरीही पुढे घुसत होते.
कोंडी फुटली आणि महाराज विशाळगडावर पोचले. त्यांनी बाजींच्या काळजीने त्वरित तोफांचा इशारा द्यायला सांगितला.
पण दुःखद बातमी गडावर पोचलीच, बाजीप्रभूंनी स्वराज्याच्या कार्यात आपल्या प्राणाची आहुती दिली. ती तारीख 11 जुलै होती.