Akshata Chhatre
विश्वजीत प्रतापसिंह राणे हे गोव्याचे नेते असून सध्या ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या विश्वजीत राणे यांनी कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू केली. सत्तरी युवा मोर्चा या संघटनेची स्थापना करून स्थानिक पातळीवर आपला प्रभाव निर्माण केला.
ते गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह रावजी राणे यांचे सुपुत्र आहेत.
वाळपई मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आणि आत्तापर्यंत वाळपई मतदारसंघात ते अपराजित आहेत.
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी विश्वजीत राणे हे क्रीडाक्षेत्रात विशेषतः बॅडमिंटनमध्ये रस घेणारे खेळाडू होते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.
जरी क्रीडा क्षेत्रातील त्यांचा सहभाग आता कमी झाला असला तरी अधूनमधून ते क्रीडा स्पर्धांमध्ये उपस्थित राहून खेळांना प्रोत्साहन देतात.
आज ते प्रामुख्याने गोव्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
ऑस्ट्रेलियात पायलट प्रशिक्षण, कुंकळ्ळीचे आमदार; गोव्याचे 'LOP Yuri'चा रंजक प्रवास