Akshata Chhatre
खेळात जसं दोन संघ महत्त्वाचे असतात, तसंच राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट तितकेच ताकदीचे असतात.
सत्ताधाऱ्यांना नमतं घ्यायला भाग पाडतो तो विरोधी पक्ष नेता. गोव्यात ही धुरा सध्या युरी आलेमाव यांच्या हातात आहे.
आलेमाव घराणं मुळातच राजकारणासाठी ओळखलं जातं, पण युरींची पहिली पसंती होती एअर पायलट होण्याची.
ते कमर्शियल एअर पायलट असून, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील बसेअर एव्हिएशन कॉलेज, न्यू साउथ वेल्स मधून त्यांनी पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की स्वतःच्या वडिलांना विमानप्रवासात सोबत घेऊन जाणं ही त्यांची मनापासूनची इच्छा होती.
युरी आलेमाव हे फक्त राजकारणी किंवा पायलटच नाहीत, तर फुटबॉलप्रेमी देखील आहेत. खेळाची आवड आणि क्रीडाप्रेम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतं.
सध्या युरी आलेमाव हे कुंकळ्ळीचे आमदार असून गोव्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून सक्रिय आहेत.