Vishalgad Fort: मृत्यूशी झुंज देणारा 'नरवीर'! शत्रूच्या 3000 सैन्याची 600 मावळ्यांनी ठेचली नांगी; बाजीप्रभूच्या शौर्याचा साक्षी 'विशालगड'

Manish Jadhav

विशालगड किल्ला

विशालगडाचे जुने नाव 'खेळणा' होते. 11व्या शतकात शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला होता. पुढे 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून त्याचे नाव 'विशालगड' ठेवले.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

शिवरायांची पन्हाळ्याहून सुटका

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटल्यानंतर महाराज पन्हाळ्याहून याच विशालगडाकडे निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि 600 विश्वासू मावळे होते.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

बाजीप्रभूंचा अभूतपूर्व त्याग

विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मृत्यूशी झुंज दिली. महाराजांना गडावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

पावनखिंडीचा रणसंग्राम

बाजीप्रभू आणि मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पुढे 'पावनखिंड' असे नाव पडले. हा इतिहास आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

स्वराज्याची अभेद्य ढाल

हा किल्ला सह्याद्रीच्या अत्यंत दुर्गम भागात आहे. चोहोबाजूंनी खोल दऱ्या आणि घनदाट जंगल असल्यामुळे शत्रूला हा किल्ला जिंकणे अशक्यप्राय होते.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

संभाजी महाराजांचे आश्रयस्थान

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याला धोरणात्मक महत्त्व होते. अनेक मोहिमांचे नियोजन आणि मुघलांविरुद्धचा लढा याच गडावरुन दिला गेला.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

रामचंद्रपंत अमात्यांचे नेतृत्व

राजारामांच्या काळात रामचंद्रपंत अमात्य यांनी विशालगडावरुनच स्वराज्याचा कारभार पाहिला. याच गडावरुन संताजी आणि धनाजींनी मुघल सैन्याला सळो की पळो करुन सोडले होते.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

वीर समाधी आणि स्मारके

गडावर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू यांच्या समाध्या आहेत. याशिवाय गडावर हजरत मलिक रेहान दर्गा आणि अनेक प्राचीन मंदिरे ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा