Budbud Tali Goa: बुडबुड्यांची तळी; गोव्यातील एक रहस्यमय तलाव!

Akshata Chhatre

बुडबुड्यांची तळी

दक्षिण गोव्यातील नेत्रावळी गावात लपलेला एक रहस्यमय तलाव, जिथे सतत बुडबुडे येतात आणि टाळ्या वाजवल्यास त्यांची गती वाढते.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

धार्मिक स्थळ आणि नैसर्गिक सौंदर्य

स्थानिकांसाठी पवित्र स्थळ, गोपनाथ मंदिराशेजारी वसलेला हा तलाव आहे. 'बुडबुड' म्हणजे कोंकणी भाषेत बुडबुडे, जे या तलावाचे वैशिष्ट्य आहे.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

बुडबुड्यांचे रहस्य

बुडबुड्यांचे कारण अजूनही एक रहस्य आहे. काही लोक देवतेचा चमत्कार मानतात, तर काही कार्बन किंवा सल्फर डायऑक्साइड वायूमुळे बुडबुडे येतात असं म्हणतात.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

ध्वनी आणि बुडबुडे

टाळ्या वाजवल्यास बुडबुडे वेगाने वर येतात, हे एक न उलगडलेले रहस्य आहे. ध्वनीशास्त्रामुळे असे घडते, असे स्थानिक सांगतात पण वैज्ञानिक स्पष्टीकरण अजूनही बाकी आहे.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

पर्यटकांसाठी नेत्रावळी तलावाचा विकास

गोवा सरकारने पर्यटकांसाठी तलावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते सुधारणे, प्रकाश व्यवस्था, पार्किंग आणि जलतरण क्षेत्र यांसारख्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्यात.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

गावाची शांतता

पणजीपासून 80 किमी आणि मडगावहून 50 किमी अंतरावर असलेले हे गाव, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

bubbling lake Goa | Dainik Gomantak

बुडबुड्यांच्या तलावाचा विहंगम देखावा

या अद्भुत तलावाला भेट द्या आणि निसर्गाच्या या चमत्काराचा अनुभव घ्या.

bubbling lake Goa | Dainik Gomantak
आनंदी का राहावं?