Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत स्टार फलंदाज विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. आज (13 एप्रिल) राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराटने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला.
आयपीएल 2025 च्या 28व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध विराटने 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावले. कोहलीने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
राजस्थानविरुद्ध अर्धशतक झळकावून कोहलीने टी-20 क्रिकेटमधील त्याचे 100 वे अर्धशतक पूर्ण केले.
विराट आता अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने 400 टी-20 सामन्यांच्या 399 डावांमध्ये 108 अर्धशतके झळकावली आहेत.
डेव्हिड वॉर्नर- 108, विराट कोहली- 100, बाबर आझम- 90, ख्रिस गेल– 88, जोस बटलर– 86 अॅलेक्स हेल्स- 85, शोएब मलिक- 83
कोहलीने आता टी-20 क्रिकेटमध्ये 109 अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 9 शतके आणि 100 अर्धशतके झळकावली आहेत.
ख्रिस गेलचा विक्रम आता विराटच्या निशाण्यावर आहे. आता येत्या सामन्यात 2 अर्धशतके झळकावून हा भारतीय स्टार फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नास किंवा त्याहून अधिक धावा काढण्याच्या बाबतीत गेलला मागे टाकेल.