Pranali Kodre
बीसीसीआयने 11 ते 17 जानेवारी दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे तब्बल 14 महिन्यांनी हे दोघेही भारताच्या टी20 संघाकडून खेळताना दिसतील.
इतकेच नाही, तर रोहित शर्माकडे अफगाणिस्तानच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्वही देण्यात आले आहे.
रोहित आणि विराट हे दोघेही भारताकडून टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील उपांत्य फेरीत अखेरचे खेळले होते. उपांत्य फेरी नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध होत असलेली ही टी20 मालिका भारतीय संघाची जूनमध्ये चालू होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीची अखेरची टी20 मालिका आहे.
त्याचमुळे रोहित-विराट पुन्हा टी20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार